उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोंडवेवाडी येथे रक्तदान शिबीर व कोरोना योध्दांचा सन्मान कार्यक्रम संपन्न.
सचिन भोंडवे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम , 62 बॉटल रक्त संकलन
सुपे प्रतिनिधी
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62 वाढदिवसानिमित्त
युवा नेतृत्व सचिन राजाराम भोंडवे मित्र परिवारामार्फत भोंडवेवाडी येथे रक्तदान शिबीर व कोरोना योध्दांचा सन्मान कार्यक्रम करण्यात आला ,
शहर आसो की गाव आजकाल विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील रक्त साठा कमी पडत असतो. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्याचा वाढदिवसाचे औचित्याने सचिन भोंडवे मित्र परिवाराच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 62 बॉटल रक्तदान करण्यात आले,
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन बारामती तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष संभाजी होळकर,जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, दौड तालुक्याचे युवा नेते तुषार थोरात , पं .समिती सदस्या निता बारवकर ,दक्षता समिती अध्यक्ष पोपट पानसरे, दौड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप हंडाळ, भोंडवेवाडीचे सरपंच कांतीलाल मेरगळ, काळखैरेवाडीचे सरपंच विशाल भोंडवे , उपसरपंच राहुल भोंडवे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप भोंडवे, ग्रामसेविका अर्चना लोणकर , पोलीस पाटील प्रज्ञा भोसले, ग्रामपंचायत सदस्य सारिका भोंडवे , उषाताई भोंडवे, जेष्ठ मार्गदर्शक फक्कड भोंडवे ,कालीदास आप्पा भोंडवे , दत्तात्रय कदम , उद्योजक नितीन भोंडवे , विशाल भोंडवे , सुरज कुतवळ,सौरभ भोंडवे , प्रशांत जगताप , आदी मान्यवर उपस्थित होते ,
या प्रसंगी श्री शहाजी विद्यालयातील विद्यार्थीनी अनुष्का बापुराव कुतवळ हिला शालेय अशियाई बुध्दीबळ स्पर्धत सुवर्ण पदक मिळाल्या बद्दल सन्मान करण्यात आला ,
सामान्य जनतेस आपल्या मार्फत हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आहे अशी माहिती सचिन भोंडवे यांनी दिली ,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शांताराम चांदगुडे यांनी व मान्यवरांचे आभार राहुल भोंडवे यांनी मानले,