Type Here to Get Search Results !

वाकीत मुस्लिमांचा मोहरम सण साधेपणात

वाकीत  मुस्लिमांचा  मोहरम सण साधेपणात

सोमेश्वरनगर प्रतिनिधी 


गुरुवारी दि 19 ऑगस्ट रोजी साजरा होणारा मोहरम सण बारामती तालुक्यातील  वाकी येथील मुस्लिम बांधव ग्रामस्थ यांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत अगदी मोजक्या लोकांच्या साजरा केला . रमजान ईद, बकरी ईद प्रमाणेच सरकारने कोविडचा प्रसार पाहता मोहरमसाठी ही नियम देखील जाहीर केले आहेत. कोविड च्या संसर्ग वाढत असल्याने   पसरलेली संसर्गजन्य परिस्थिती पाहता इतर कार्यक्रमांप्रमाणे मोहरम सोप्या पद्धतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या अनुषंगाने   वाकीत मोहरम सण .शांततेत पार पडला . वाकी गावात दरवर्षी ३ ताबुत सजवले जात असून एकत्रित सर्व ग्रामस्थ त्याची पुजा करतात हिंदु-मुस्लीम समाजाच्या एकोप्याचे दर्शन या माध्यमातून दिसून या गावात दिसून  येते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षे साध्या पद्धतीने कार्यक्रम पार पडला जात आहे . कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दुरक्षेत्र साज पोलीस कर्मचारी  मन्यार साहेब, अमोल भोसले , नितीन बोराडे  यांनी चोख बंदोबस्त ठेवला असून या कार्यक्रमासाठी वाकी ग्रामपंचायत सरपंच किसन बोडरे , उपसरपंच हनुमंत जगताप,सदस्य-इंद्रजीत जगताप,दि बा गाडे, हनुमंत गाडेकर, रविंद्र जगताप.पोलीस पाटील हनुमंत जगताप , तंटामुक्ती कमेटी सदस्य व मान्यवर ग्रामस्थ बंधु-भगिनी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test