शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तेलबिया व कडधान्य खरेदीसाठी महत्वाची बातमी.
पुणे दि. 18 :- राज्यात हंगाम 2021-22 मध्ये पुणे जिल्ह्यात नाफेडमार्फत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मुग, उडीद व सोयाबीन खरेदीची केंद्र सुरु करण्याचे नियोजन करावयाचे आहे. खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठी ईच्छुक खरेदी संस्थेने 24 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, सहकार वैभव, प्लॉट नं. ई-3, गुलटेकडी मार्केटयार्ड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंक अधिकारी यांनी केले आहे.
तरी ईच्छुक खरेदी संस्थेने 24 ऑगस्ट रोजी सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, सहकार वैभव, प्लॉट नं. ई-3, गुलटेकडी मार्केटयार्ड, दुरध्वनी क्र.20-24270141, 24264623, मो. नं. 7972558629 या ठिकाणी संपर्क साधावा, असेही जिल्हा मार्केटिंग अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.