मु.सा.काकडे महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे.
कै.बाबालाल काकडे-देशमुख स्मृती व्याख्यानमाला
शैक्षणिक वर्ष २०२१- २०२२ - वर्ष - ९ वे
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
दि. ०२/०८/२०२१ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी 'सामाजिक जबाबदारी' या विषयावर प्रा.अच्युत शिंदे यांनी विचार मांडले.माणूस हा समाजशील प्राणी असून प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वर्तन केले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री. अभिजित सतीशराव काकडे - देशमुख हे होते. त्यांनी व संचालक रूषिकेश धुमाळ यांनी कै . बाबांच्या स्मृतींना अभिवादन करून व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य जवाहर चौधरी यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करून कै. बाबांच्या स्मृतींना उजाळा दिला. सदर कार्यक्रमास व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. संकेत जगताप, सहसचिव श्री . सतीश लकडे हे व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले केले. त्यामध्ये कै.बाबांची दानशूर वृत्ती, त्यांची सामान्य जनतेविषयीची तळमळ, त्यांचं सहकार, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. तर डॉ.संजय जाधव यांनी आभार मानले.
दि. ०३ / ०८ / २०२० रोजी व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी 'पर्यावरण जाणीव जागृती ' या विषयावर डॉ. श्रीकांत घाडगे यांनी व्याख्यान दिले. वाढते औद्योगिकीकरण , नागरीकरण त्यातून निर्माण होणारे प्रदूषण , अमर्याद वृक्षतोड ,वाढणारे तापमान यामुळे निसर्गाचा असमतोल होत आहे. पर्यावरण वाचविले तरच जीवसृष्टी वाचेल तेव्हा मानवी समूहाने पर्यावरणाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अशी भूमिका त्यांनी मांडली. सदर कार्यक्रमाचे आभार डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी मानले
दि. ०४ / ०८ / २०२० रोजी व्याख्यानमालेचा तिसरा दिवस या दिवशी 'स्री-पुरूष समानता ' या विषयावर उपप्राचार्य प्रा.डॉ. जया कदम यांनी विचार मांडले स्त्रीचा बाईपणा कडून माणूसपणाकडे होणारा प्रवास किती बिकट आहे. याची मांडणी त्यांनी केली .स्त्रीकडे एक वस्तू म्हणून नव्हे तर माणूस म्हणून पाहिले पाहिजे. यासाठी अजूनही समाजप्रबोधनाची गरज आहे.अशी भूमाकाा त्यांनी मांडली. कार्यक्रमाचे आभार डाॅ. देविदास वायदंडे यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, सेवक कार्यक्रमास उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेवून व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.