ऑलिम्पिक सुवर्णयुग शिल्पकार मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी कार्यालयात साजरा.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी.
मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस म्हणून 29 ऑगस्ट संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जात असतो ...
भारताच्या खेळाचे नाव जगाच्या नकाशावर टाकणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करून,त्यांच्या हॉकी मांत्रिकाची देशभरात पूजा केली जाते.
29 ऑगस्ट 2021 रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त कोरोनाचे सर्व नियम पाळत सोमेश्वर स्पोर्ट ॲकॅडमी कार्यालय येथे बारामती तालुका क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे व सोमेश्वर स्पोर्ट्स अकॅडमी सचिव अँँड.गणेश आळंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष भाऊसाहेब लकडे व आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष अनिल शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार व दीपप्रज्वलन करत त्याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी विक्रम लकडे,मोहन लकडे ,कृष्णा लकडे व भारतीय पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष विनोद गोलांडे व मान्यवर उपस्थित होते.