Type Here to Get Search Results !

मु. सा काकडे महाविद्यालयात कोविड-१९ जनजागृती रॅलीचे आयोजन...

मु. सा काकडे महाविद्यालयात कोविड-१९  जनजागृती रॅलीचे आयोजन...

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु. सा काकडे महाविद्यालयात सामाजिक बांधिलकी जपत व कोरोनाचे सर्व नियम पाळून कोविड -१९ जनजागृती रॅलीचे आयोजन आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले. रॅलीचा शुभारंभ महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे - देशमुख, सचिव. प्रा. जयवंत घोरपडे, सह- सचिव. सतीश लकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य. जवाहर चौधरी, संस्थेचे व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय घाडगे, नितीन कुलकर्णी, प्रा. महेंद्र जाधवराव, ऋषिकेश धुमाळ, प्रा. सुजाता भोईटे, उपप्राचार्य. डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. प्रविण ताटे - देशमुख,  विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. देवीदास वायदंडे, डॉ. श्रीकांत घाडगे, वरीष्ठ विभागाचे आरोग्य आणि शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा. दत्तराज जगताप उपस्थित होते.
    
   रॅली मधून पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. रॅलीचा प्रारंभ मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वर नगर येथून होऊन वाघळवाडी-सोमेश्वरनगर ते सोमेश्वर कारखाना, करंजेपुल, करंजे - मार्गे श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान मंदिर येथे रॅलीची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test