Type Here to Get Search Results !

बारामती तालुक्यात वीकएंड लॉगडाऊन मध्ये बदल उद्यापासून शनिवारी- रविवार दुकाने चार वाजेपर्यंत सुरू पण नियम अटी लागू

बारामती तालुक्यात  वीकएंड लॉगडाऊन मध्ये बदल उद्यापासून शनिवारी- रविवार दुकाने  चार वाजेपर्यंत सुरू पण नियम अटी लागू


सोमेश्वरनगर प्रतिनिधी   

बारामती तालुक्यातील  कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वीकएंड लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र राज्य शासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतर बारामतीत सुरू असलेला वीकएंड लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. तसेच शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटही ५० टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु बाजारपेठ दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

बारामतीत मागील काही महिन्यांपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. याचदरम्यान, बारामतीत वीकएंड लॉकडाऊनही सुरू करण्यात आला होता. मात्र आता राज्य शासनानेच निर्बंध शिथिल करण्याची भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र उर्वरीत ११ जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले.

नुकतीच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेत पुणे शहरातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बारामतीतही निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली होती. या दरम्यान, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी बारामतीतील वीकएंड लॉकडाऊन रद्द करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार बारामतीत आता नियमीतपणे शासनाने ठरवलेल्या वेळेनुसार बाजारपेठ सुरू राहणार आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test