Type Here to Get Search Results !

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार

पुणे जिल्हयातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना कळविण्यात येते. की ज्यांचे पाल्य सन २०२०-२१ मध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता १० वी, १२ वी व पदवी परिक्षा उत्तीर्ण होवून पुढील शिक्षण घेत आहेत अशा सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. 
शिष्यवृत्तीचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी त्यांचे पाल्यांचे अर्ज दि. १५ ऑक्टोबर २०२१ पूर्वी आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test