Type Here to Get Search Results !

चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर

चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर 


सोमेश्वनगर प्रतिनिधी

चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर 
अवघ्या महाराष्ट्रभर सध्या गाजत असलेल्या व घराघरात पोहोचलेल्या  चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरीजचे बाळासाहेब यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पथनाट्य, किर्तन व वेबसिरीजच्या माध्यमातून मनोरंजन करीत अभिनय क्षेत्रामध्ये आपला वेगळाच ठसा उमटविणारे ह.भ.प.भरत पांडुरंग शिंदे उर्फ बाळासाहेब यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
तब्बल दोन तपाहून अधिक काळ रंगमंच गाजवत अस्सल ग्रामीण भाषा शैलीत बारामती तालुक्यातील कांबळेश्वर गावचे कला पथक मनोरंजनातून प्रबोधन करीत आहे. यातील भरत शिंदे हा हरहुन्नरी कलाकार तर आपल्या अभिनय शैलीतून रसिकांना खळखळून हसवतो. पथनाट्य, किर्तन व चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजच्या माध्यमातून कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण शुक्रवार ता. ६ ऑगस्ट रोजी मुंबई बांद्रा येथील रंगशारदा ऑडिटोरीयम येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक कल्याण जाणा व उपाध्यक्ष सोनम पाटील यांनी दिली.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test