अकाली निधन पावलेल्या जिवलग मित्राच्या निराधार कुटूंबाला सोमेश्वर च्या वर्ग मित्र परिवारातर्फे ५१ हजारांची मदत
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
फलटण येथील कै. चंद्रकांत घोडके यांचे चार महिन्यापुर्वी म्हणजे दि.03/04/2021 रोजी अकाली निधन झाले. पतीच्या अकाली निधनामुळे निराधार झालेल्या चंद्रकांत यांच्या दोन मुली,मुलगा व पत्नी यांना दैनंदिन जीवन जगणेही कठीण झाले होते. ही बाब लक्षात येताच सोमेश्वर विद्यालयात शिकत असलेल्या 1990 या बँचच्या वर्गमित्रांनी एकत्र येत,त्यांच्या कुवतीप्रमाणे पैसे जमा करुन तब्बल 51 हजार रुपये जमा करुन चंद्रकांत यांच्या कुटुंबियांना फलटण येथे घरी जाऊन धनादेश देत आपले मित्रकर्तव्य बजावत मोठे औदार्य
दाखवले.मित्राच्या कुटूंबात कोणीही कर्ता पुरुष
राहिला नसल्याने जीवलग मित्राच्या निधनानंतरही मैत्रीच्या कर्तव्याला जागून मित्राच्या कुटूंबासाठी धावून येणाऱ्या या मित्रांचा आदर्श प्रेरणादायी आहे.
या कुटूंबाला दैनंदिन जीवनही जगणे कठीण झाले होते. ही बाब चंद्रकांत च्या वर्गमित्र असलेल्या मित्रपरिवाराच्या लक्षात येताच एकवीस मित्रांनी ऐपतीप्रमाणे पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. बघता बघता 51 हजार रुपये जमा झाले,ही मदत सोमेश्वर,पुणे व इतर जिल्हा तसेच परदेशातूनही ऑनलाईन स्वरूपात जमा झाली.या मैत्रीला आधार देण्याचे काम मृणालिणी अलगुडे ,स्वाती गायकवाड शुभांगी खलाटे,संजय शिंदे,अतुल वाघ,अभिजित केंजळे,अर्चना मावळणकर,सत्यजित जगदाळे,सुनिल घाडगे,सोमनाथ धनवडे,दादासो गायकवाड,संजय मगर,विजयानंद जगताप,भास्कर काजळे,राजेंद्र जगताप,संतोष गायकवाड,सदाशिव काळखैरे नंदकुमार बोडरे,सुरेखा मोदी,राजेंद्र राऊत या वर्ग मित्र-मैत्रिणींनी एकत्र येत जमा केली,
त्यांचा हा उपक्रम पाहून त्यांचे शिक्षक भास्करराव कदम सर यांनीही मदत केली.ही रक्कम रविवार दि.15 ऑगस्ट रोजी एस एस सी 1990 या ग्रुपचे वतीने देण्यात आली.त्याच्या कुटुंबियांना 51- हजार रूपये मदतीचा धनादेश दादासो.गायकवाड व सुनिल घाडगे यांच्या हस्ते फलटण येथे त्यांचे राहत्या घरी जाऊन देण्यात आली.
या प्रसंगी चंद्रकांतची पत्नी,मुलगा व दोन्ही मुली उपस्थित होत्या.या मदतीबद्दल घोडके कुटुंबियांनी या ग्रुपबद्यल कृतज्ञता व्यक्त केली.