तो.. दिव्यंग असूनही पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देण्यास त्याचे हात सरसावले...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
महाड ,चीपळून ,कोल्हापूर ,सांगली अशा अनेक गावांमध्ये पूरस्थिती भयानक संकट स्वरूप आल्याने बऱ्याच कुटुंबाचे घर उध्वस्त झालेले असून मोठी मनुष्य , प्राणी व आर्थिक हानी झाल्याचे आपण पाहत आहे.. मदत म्हणून महाराष्ट्रातील सर्वच सामाजिक, राजकीय शैक्षणिक तसेच संघटना कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावले आहेत असे असतानाच बारामती तालुक्यातून पूरग्रस्तांना मदत करण्याचे कार्य सोमेश्वरनगर मधील आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वर नगर ,श्री सेवाभावी संस्था सोमेश्वर पंचक्रोशी तसेच भारतीय पत्रकार संघ यांच्या वतीने दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत मदतकार्य किराणा साहित्य तसेच पाणी ,सुकामेवा धान्य स्वरूपात स्वीकारणे सुरू आहे व तशी सोमेश्वरनगर मधील सामाजिक करकर्ते व सामाजिक संघटना मदत पोच करत आहे.असे असताना बारामतीतील निंबुत मधील पुणे जिल्हा आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे- देशमुख यांच्या अपंग कार्यकर्त्यांने आज पूरग्रस्तांसाठी १५ पाण्याच्या बॉटल बॉक्स , दहा फरसाण पुढे तसेच चार डझन खारी- टोस्ट म्हणून मदत पोच केली आहे या मदतीमुळे सोमेश्वर परिसरात दोन्ही पायांनी अपंग, स्वतःची छोटीशी चहाची टपरी असणारे रवींद्र दत्तात्रय गिरी राहणार निंबुत यांनी दिलेल्या मदतीमुळे त्यांचे सोमेश्वरनगर परिसरात कौतुक होत आहे.
ही मदत स्वीकारताना आजी-माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर , कोरकमेटी सदस्य चंद्रकांत सोनवणे ,श्री सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे , पत्रकार विनोद गोलांडे , हर्षल भोईटे , पवार उपस्थित होते दिलेल्या मदतीमुळे उपस्थितांनी त्यांचे आभार मानत कौतुक केले व मायेचा हात फिरवला.
पूरग्रस्तांसाठी मदत कार्य स्वीकारणे चालू असून ज्या संघटनांना व सामाजिक कार्यकर्ते यांना मदत द्यायची आहे त्यांनी आजी माजी सैनिक संघटना कार्यालयत जमा करावी ही नम्र विनंती.
...कार्याध्यक्ष - बाळासाहेब शेंडकर...
👌👍👍👍
ReplyDelete