Type Here to Get Search Results !

महत्त्वाची बातमी ;माजी सैनिक/ विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार

महत्त्वाची बातमी ;माजी सैनिक/ विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार


पुणे, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये पुणे जिल्हयातील माजी सैनिक /विधवांच्या पाल्यामधून इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या एक-एक पाल्यांची निवड एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी दिली आहे.
            पुणे जिल्हयातील संबंधित माजी सैनिक/ विधवांनी त्यांचे पाल्यांचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज २० सप्टेंबर २०२१ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने  यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test