सदोबाचिवाडी गावामध्ये निकिता यादव या कृषिकन्या मार्फत विविध कृषिविषयक उपक्रमाचे आयोजन..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,
बारामती तालुक्यातील सदोबाची वाडी गावांमध्ये निकिता यादव या विद्यार्थिनीने कृषीविषयक शेतकऱ्यांना माहिती देत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय फलटण येथे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी निकिता यादव हिने सदोबाचिवाडी तालुका बारामती येथील शेतकऱ्यांसाठी शेती विषयक विविध उपक्रम राबवले असून यामध्ये प्रामुख्याने बीजप्रक्रिया ,फळबाग लागवड, मधमाशा पालन ,पशुसंवर्धन तसेच शेती आधारित तंत्रज्ञान मोबाईल द्वारे कसे वापरावे याची माहिती देण्यात आली तसेच शेतीसंबंधी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह करून दाखवण्यात आली यावेळी सदोबाचिवाडी परिसरातील शेतकऱ्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला याप्रसंगी प्राचार्य डॉ.सागर निंबाळकर , कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.व्ही. पी गायकवाड, प्रा. एन एस धालपे, प्रा. एस वाय लाळगे, प्रा. एस एस नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची माहिती देण्यात आली.