Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत एक हजार कोटी इतक्या निधीचे वितरण

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत एक हजार कोटी इतक्या निधीचे वितरण

पुणे,राज्यात नोव्हेंबर 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी सुरु झाली असून आत्तापर्यंत सुमारे 1 हजार कोटी पेक्षा जास्त निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत पुणे विभागातील पुणे जिल्हयात 89 कोटी 48 लाख 59 हजार रुपये, सातारा जिल्हयात 37 कोटी 14 लाख 42 हजार रुपये तर सोलापूर जिल्हयात 39 कोटी 62 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. सन 2021-22 साठी लाभार्थी नोंदणीचे पुणे जिल्हयासाठी 2 लाख 6 हजार 420 इतक्या उद्दिष्टापैकी 2 लाख 8 हजार 166 म्हणजे 101 टक्के लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टलवर करण्यात आली आहे.
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा माता यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी तसेच जन्माला येणा-या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा या उद्देशाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविली जाते.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  केंद्र शासनाने दिनांक 1 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान सर्व पात्र लाभार्थींनी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्त्या, एएनएम, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडे लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड, आधार संलग्न बँक, पोस्ट खाते, माताबाल संगोपन कार्ड, बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test