बहुजन समाजसेवा संघ करंजे यांच्या वतीने पूरग्रस्तांना एक हात मदतीचा.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजे गाव परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी बहुजन सेवा संघ करंजे यांच्या वतीने पूरग्रस्त कुटूंबीयांना किराना साहित्य स्वरूप मदत देण्यात आली.
महाड ,चीपळून ,कोल्हापूर ,सांगली अशा अनेक गावांमध्ये पूरस्थिती भयानक संकट स्वरूप आल्याने बऱ्याच कुटुंबाचे घर उध्वस्त झालेले असून मोठी मनुष्य , प्राणी व आर्थिक हानी झाल्याचे आपण पाहत आहे.. मदत म्हणून महाराष्ट्रातील सर्वच सामाजिक संघटना तसेच नागरिक व सामाजीक कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावले आहे.
आजी-माजी सैनिक संघटना कार्यालय गायकवाड वस्ती करंजेपुल येथे संस्थापक अध्यक्ष पोपट हुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली किराणा साहित्य किट कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांच्या कडे सुपूर्द करताना बहुजन समाजसेवा संघ करंजे अध्यक्ष गणेश मदने, सचिव विठ्ठल मंगरुळे, खजिनदार किशोर हुंबरे,कार्याध्यक्ष विनोद गोलांडे,जेष्ठ मार्गदर्शक सदस्य माऊली केंजळे, करंजे ग्रा. सदस्य दत्तात्रय फरांदे,अधित्य हुंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.