पारगाव येथे गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी जेरबंद: जेजुरी पोलिसांची कारवाई
पुरंदर प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे या ठिकाणी ट्रॅक्टर ने मोटर सायकल चालकाला साईड दिली नाही या कारणावरून ज्या टोळक्याने दहशत माजवली होती. त्यांच्यावर बेकायदा जमाव जमवणे तसेच बेकायदा हत्यार बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे. जेजुरी पोलिसांनी ज्या दिवशी गुन्हा घडला त्यादिवशीच मोठ्या प्रमाणावर राजगड, भोर, सासवड पोलिस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवून त्यातील सात आरोपी अटक केले होते. यातील मुख्य आरोपी आदित्य कळमकर व आदित्य चौधरी यांच्यासाठी जेजुरी पोलीस ठाण्याच्या वेगवेगळ्या टीम रात्रंदिवस आरोपींचा शोध घेत होत्या व आरोपींच्या पाळतीवर होते. सदर आरोपींची दिनांक 26 ऑगस्ट रोजी त्यांच्या पाळतीवर असताना व संभाव्य ठिकाणी कोणत्या भागात असतील याचा शोध घेत असताना जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भल्या पहाटे त्यांना पकडण्यात आले. पकडलेले आरोपी हे निर्ढावलेले असल्याने त्यांचे माननीय न्यायालय पाटील मॅडम यांच्याकडून सात दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आली. या पोलिस कस्टडी दरम्यान आरोपी आदित्य भगवान कळमकर ( रा. बेलसर), आदित्य तानाजी चौधरी( रा. नारायणपूर), सागर काळूराम वायकर (रा. पिसर्वे) श्रेयस संतोष थिटे( रा. विर ) आकाश प्रकाश काळे (रा. सोनोरी) या सर्व 20 ते 25 वयोगटातील गुन्हेगारांकडून गुन्ह्यात वापरलेली चार चाकी स्विफ्ट डिझायर गाडी जप्त करण्यात आली. तसेच सदर गुन्ह्यात पळून जाताना लोकांनी आडवल्यानंतर ज्या अग्नी शस्त्राचा वापर गुन्हेगारांनी केला ते अग्निशस्त्र पोलिसांनी हस्तगत केलेले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले चार धारदार हत्यारे जप्त केलेली आहेत.
या पोलिस कस्टडी दरम्यान आरोपी यांनी सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतून जबरी चोरी करून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार चोरून आणल्याचे निष्पन्न झालेले आहेत. सदर आरोपींकडे कसून चौकशी करून बरेच गुण यासंबंधी माहिती घेण्यात आलेली आहे. या गुन्ह्यांमध्ये या टोळीने विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यामुळे या आरोपी विरुद्ध बालकांच्या विषयीचा अधिनियम कलम 83 पोटकलम 2 याचा सुद्धा वापर केलेला आहे. जर गुन्हेगारी टोळीने बालकांचा गुन्ह्यासाठी वापर केला तर त्याला सात वर्षे सजे चे प्रावधान या कायद्यात आहे. या टोळी विरुद्ध पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केलेले आहेत व या टोळीला जास्तीत जास्त न्यायालयाकडून शिक्षा होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. यासारखी जर दहशत कृती कुणी करत असेल तर पोलिस त्याच्यावर सक्त कारवाई करणार आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रत्यक्ष देखरेखीखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव कुतवळ चंद्रकांत झेंडे पोलीस हवालदार संदीप कारंडे विठ्ठल कदम पोलीस नाईक कैलास सरक अक्षय यादव गणेश कुतवळ धर्मवीर खांडे देवेंद्र खाडे पोलीस शिपाई प्रवीण शेंडे चालक पोलीस हवालदार संजय धमाल व भानुदास सरक