Type Here to Get Search Results !

महत्वाची बातमी;ओटीपीमुळे नाहक त्रास.....

ओटीपीमुळे नाहक त्रास.....

बारामती प्रतिनिधी

जुन्या मुळ वाहन मालकाच्या मोबाईल क्रमांकावर वाहनाचे कसल्याही प्रकारचे काम असले तरी ओटीपी नंबर जात असल्याने ज्यांनी वाहन वाहन बाजार अथवा त्या वाहनाचे जुन्या मुळ वाहन मालकाने वाहन विकल्यानंतर ते वाहन त्यानंतर दोन,तीन लोकांच्या नावावर झाल्यानंतर सुद्धा पुन्हा त्या वाहनाचे कसल्याही प्रकारचे काम करावयाचे असल्यास (उदा.वाहन हस्तांतरित करणे, वाहनावरील फायनांस कंपनीच्या तसेच बँकेच्या बोजाची नोंद कमी करने,तसेच फायनांस कंपनीच्या,बँकेच्या बोजाची वाहनावर नोंद करने,पर्यावरणकर भरने,योग्यताप्रमाण पत्राची तपासणी करने) त्या वाहनाचा ओटीपी क्रमांक हा जुन्या मुळ मालकाच्या मोबाईल क्रमांकावर जात आहे.


       सदर वाहन मुळ मालकांनी विकले आहे. व पुढे ते वाहन दोन,तीन मालकांच्या नावावर हस्तांतरही झाले आहे.त्यानंतर सदर वाहन ज्याच्या ताब्यात व नावावर आहे.त्यांना ते वाहन तत्काळ विकुन नवीन वाहन घ्यावयाचे आहे.अथवा त्यांना काही आर्थीक अडचन निर्माण झाली असता.सदर वाहन मालक यांना त्या वाहनाची विक्री करण्यासाठी तत्काळ ग्राहक भेटने अत्यंत जिकिरीचे असते. त्यामुळे सदर वाहन मालक तत्काळ वाहनाची विक्री करण्यासाठी वाहन खरेदी विक्री करणारे यांच्या वाहन बाजारामध्ये जावून ते त्या वाहनाची रोख रक्कम घेऊन विक्री करतात.व आपली नवीन वाहन खरेदी करण्याची ईच्छा पूर्ण करतात.तर ज्यांना आर्थिक अड़चन निर्माण झाली ते सदर वाहन रोख रक्कम घेऊन विक्री करतात.व आपली गरज पूर्ण करतात.परंतु यामधील काही वाहनावर फायनांस कंपनीच्या व बँकेच्या बोजाची नोंद असते,त्या वाहन मालकांनी फायनांस कंपनीचे,बँकेचे कर्ज भरलेले असते,व त्याची एनओसी सुद्धा आणलेली असते.त्या मध्ये फॉर्म क्रमांक ३५ दोन व फायनांस कंपनीचे,बँकेचे पत्र सदर वाहनावरील बोजाची,कर्जाची नोंद कमी करण्यासाठी आरटीओ यांच्या नावाने पत्र असते.परंतु सदर वाहन मालक आरटीओ मधुन फायनांस कंपनीच्या, बँकेच्या कर्जाची,बोजाची नोंद कमी न करता सदर कागदपत्र वाहन खरेदी,विक्री करणारे वाहन बाजारवाले यांना देतो. व वाहनाची विक्री करुण रोख रक्कम घेऊन मार्गस्थ होतो.

        त्यात आता एनओसी बंद झाली असल्याने व नुकताच आता नव्याने आरटीओ खात्याने आदेश काढले आहेत,कि कोणत्याही वाहनाचे आरसी,स्मार्ट कार्ड बायहँड मिळणार नाहीत.त्यामुळे आरसी,स्मार्ट कार्ड बायहँड मिळने बंद झाले असुन,सदर वाहनांची आरसी,स्मार्ट कार्ड स्पीड पोस्टने वाहन मालकांच्या पत्त्यावर घरपोच पाठवण्याचे आदेश काढले आहेत.त्यामुळे सदर वाहनाचे आरसी,स्मार्ट कार्ड जो वाहन मालक वाहन खरेदी,विक्री करणारे बाजारवाले यांना वाहन विकुन वाहनाची सर्व रक्कम रोख स्वरुपात घेऊन गेला आहे.त्याच वाहन मालकांच्या घरी वाहनाचे आरसी,स्मार्ट कार्ड स्पीड पोस्टने घरपोच जात असल्याने वाहन खरेदी,विक्री करणारे वाहन बाजारवाले व जूने वाहन खरेदी करून आपल्या नावावर वाहन हस्तांतरित करनारांची फार मोठी पंचायत झाली आहे.
        
       परंतु जे वाहन विक्री खरेदी करणारे बाजारवाले आहेत,ते सदर वाहन खरेदी करताना लाखो रूपयांची गुंतवणूक करून वाहन खरेदी करतात.व जो पर्यंत त्या वाहनाला ग्राहक मिळत नाही,तो पर्यंत ते वाहन सांभाळून ठेवतात.व नवीन ग्राहक मिळाल्यानंतर सदर वाहनाची विक्री करतात.

       परंतु या पूर्वी वाहन हस्तांतर असो की वाहनाचे इतर कोणतेही काम असो, ते करीत असताना कोणताही मोबाईल क्रमांक टाकला की त्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी नंबर जात असे.व सदरचे काम तत्काळ होत असे. परंतु ऑगस्ट २०२१ पासून वाहनाचे कसल्याही प्रकारचे काम करीत असताना सदर वाहनाचा ओटीपी नंबर हा मुळ मालक यांचा जो नवीन वाहन खरेदी करुण त्या वाहनाची आरटीओ कार्यालयात नोंदणी करताना ज्या मोबाईल क्रमांकाची नोंद झाली आहे.त्याच मोबाईल क्रमांकावर ओटीपी नंबर जात आहे.त्यामुळे ज्यांनी कोणी ते वाहन विकत घेतले आहे.व ते वाहन त्यांना त्यांच्या नावावर हस्तांतरित करवायाचे आहे.त्यांची फार मोठी पंचायत,अडचन निर्माण झाली आहे.कारण सदर वाहन जुन्या, मुळ मालकांनी विकुन पाच ते दहा वर्षाचा कालावधी झालेला आहे.त्यामुळे त्या जुन्या मुळ मालकाचा संगनकावर उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता सदर जूना मुळ वाहन मालक सर्व प्रथम गोंधळून जातो.कारण सदर वाहन हे त्यांनी पाच ते दहा वर्षा पूर्वी विकले असल्याने ते तत्काळ त्यांना आठवत नाही.व ते त्यामुळे ओटीपी नंबर देत नाहीत.तर काही जुन्या मुळ मालकांचा मोबाईल नंबरच बदललेला असल्याने किंवा बंद केला असल्याने सदर मोबाईल क्रमांक हा महाराष्ट्र राज्यात अधवा इतर राज्यात दुसऱ्याच कोणाच्या तरी नावाने चालू झालेला असतो.त्यामुळे त्यांना या वाहनाबाबत कसलीच माहिती नसते.त्यामुळे त्यांना नवीन अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन केला असता त्यांच्याकडून ओटीपी नंबर मिळणारच नाही.आणि ते स्वाभाविक आहे.
       
     एक प्रकारे त्यांचेही बरोबरच आहे.कारण सध्या ओटीपी नंबर घेऊन अनेकांची बँकेत फसवणूक झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test