Type Here to Get Search Results !

पुरंदरमध्ये कॉंग्रेस नेत्रदीपक कामगिरी करेल : जगताप

पुरंदरमध्ये कॉंग्रेस नेत्रदीपक कामगिरी करेल : जगताप

पुरंदर प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यात कॉंग्रेसच्या माध्यमातून अनेक विकास कामे होत असताना विरोधकांनी मात्र गुंजवणीचे भांडवल करून जनतेसमोर पुन्हा थापा मारण्यास सुरवात केली आहे परंतु आगामी काळात पुरंदरमध्ये गुंजवणीसह आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावून कॉंग्रेस नेत्रदीपक कामगिरी करेल असा विश्वास आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केला.
पुरंदर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून  वेगवेगळ्या विभागामार्फत जवळपास ३२ कोटींची विकास कामे मंजूर झाली आहेत त्यापैकी पिसुर्टी गावासाठी १ कोटी ७२ लाख रुपयांच्या विविध प्रास्ताविक व मंजूर विकास कामांचे उद्घाटन आमदार संजय जगताप व पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार संजय जगताप हे बोलत होते.
या प्रसंगी कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण शिवशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे पंचायत समिती पुरंदरचे सदस्या सुनिता कोलते नीरा गावचे सरपंच राजेश काकडे ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे अशोक बरकडे माणिक चोरमले सविता बरकडे रामदास काळे खंडू चोरमले सुखदेव बरकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगताप पुढे म्हणाले पुरंदर तालुक्यात कॉंग्रेसने जनतेचे मुलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवले असून अनेक विकास कामे देखील मार्गी लावली आहेत .परंतु आगामी काळात होऊ पाहणाऱ्या उत्तुंग विकास कामांमुळे माजी मंत्री आत्तापासून अस्वस्थ होऊन बिनबुडाचे आरोप करू लागले असल्याचा घणाघाती आरोप देखील त्यांनी विजय शिवतारे यांचे नाव न घेता केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय चोरमले तर सूत्रसंचालन नवनाथ बरकडे  यांनी केले .यावेळी उपस्थितांचे आभार सरपंच सारिका चोरमले यांनी मानले.


अहिल्यादेवी मंदिराची उभारणी व्हावी ..

धनगर समाजाचे आराध्य दैवत अहिल्याबाई होळकर यांचे पिसुर्टी गावात मंदिर व्हावे अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने राजेंद्र बरकडे यांनी आमदार संजय जगताप यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test