करंजे ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी.
सोमेश्वनगर प्रतिनिधी,
बारामतीतील करंजे ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती शासनने दिलेल्या सर्व कोरोनाचे नियम पळत साजरी करण्यात आली या वेळी प्रतिमा पुजन करंजे सरपंच जया संताजी गायकवाड यांनी केले .
तर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर करंजे येथे पूजन सचिन पाटोळे यांनी केले त्यावेळी बोलताना पाटोळे म्हणाले की ज्यांनी साहित्यातून नेहमीच वंचित असलेल्या समाजाच्या वास्तव जीवनचे दर्शन घडवले ते आपल्या लेखणीतून सातत्याने दलित, वंचित, पीडित,उपेक्षित आणि अन्यायग्रस्त माणसाची व्यथा मांडत राहिले तर " ही पृथ्वी शेषनागावरच्या मस्तकावर नसून , कामगार दलित ,उपेक्षिताच्या तळहात वरती वसलेली आहे," संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोलाची कामगिरी वर्तवली
अश्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करत
जयंती साजरी केली.
या वेळी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, मातंग नवनिर्माण सेना पुणे जिल्हाअध्यक्ष अध्यक्ष सचिन पाटोळे, पुणे शहर पोलीस संदीप गायकवाड,राहुल हुंबरे, अविनाश पाटोळे, सोनू पाटोळे,नेताजी पाटोळे, धनाजी भिशे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थिती होते.