Type Here to Get Search Results !

सोमेश्वर विज्ञान महाविदयालयातर्फे सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना खादयपदार्थ व जीवनावश्यक वस्तुंची मदत.

सोमेश्वर विज्ञान महाविदयालयातर्फे सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना खादयपदार्थ व जीवनावश्यक वस्तुंची मदत.

सोमेश्वरनगर : 

बारामती तालुक्यातील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर विज्ञान महाविदयालय सोमेश्वर नगर, आणि आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विदयार्थी यांनी सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वर्गणी जमा केली. या वर्गणीमधून बिस्कीटपुडे आणि इतर खादयपदार्थ व काही जीवनावश्यक  वस्तुंची खरेदी करण्यात आली. हे खादयपदार्थ व जीवनावश्यक वस्तु सर्व एकत्रीतपणे आर्ट ऑफ लिव्हींगचे स्वयंसेवक डाॅ. तृप्ती बारवकर , सुरज पवार, सिद्धार्थ जगदाळे, वरद फडतरे व सातारा एस. टी. सी.  मार्फत  कोल्हापूर ,सांगली कडे रवाना करण्यात आले. या उपक्रमामध्ये महाविदयालयाचे प्राचार्य धनंजय बनसोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्रा. मयुरी यादव आणि प्रा. मृणाली चव्हाण यांनी उपक्रमामध्ये मदत केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test