Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर

महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर
 
पुणे दि. २०:- केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या मार्फत इयत्ता १२ वी व पदवी उत्तीर्ण होऊन व्यावसायिक अभ्यास क्रमासाठी प्रवेश घेतलेल्या भारतातील ५५०० माजी सैनिकांच्या पाल्यांना दरवर्षी पंतप्रधान शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०२०-२१ साठी महाराष्ट्रातील ५०० माजी सैनिक पाल्यांचे पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज शिफारस करुन केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आले होते, त्यामधील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना म्हणजेच अर्ज केलेल्यांपैकी ८२.६० % पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृती मंजूर झाली आहे. यामध्ये भारत देशात महाराष्ट्र राज्याचा पाचवा क्रमांक आहे. राज्यातील ४१३ माजी सैनिक पाल्यांकरीता शिष्यवृत्ती रक्कम रुपये १ कोटी ३६ लाख ८ हजार दरवर्षी कोर्सचा कालावधी असे पर्यंत प्राप्त होणार आहे, असे पुणे सैनिक कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test