Type Here to Get Search Results !

अमृतमहोत्सवानिमित्त देशभक्तीपर वर्गस्तरीय ऑनलाईन विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न.

अमृतमहोत्सवानिमित्त  देशभक्तीपर वर्गस्तरीय ऑनलाईन विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न.


सोमेश्वरनगर प्रतिनिधी,

शनिवारी दि 21 रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.१ (मुलांची) आयोजित महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि पुणे जिल्हा परिषद यांच्या सूचनेप्रमाणे  स्वतंत्र भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त  देशभक्तीपर वर्गस्तरीय ऑनलाईन विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय सरपंच  सुनिल ढोले होते.यावेळी जय मल्हार क्रांती संघटना बारामतीचे अध्यक्ष  हनुमंत खोमणे,शिवसेनेचे बारामती विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश मदने,सामाजिक कार्यकर्ते सुनिल खोमणे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य.अनिल खोमणे,ग्रामविकास अधिकारी.शहानुर शेख,शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षक अनिल गवळी आणि पालक उपस्थित होते.तर या स्पर्धेत चित्रसंकलन मध्ये प्रथम सोहम साळवे ,चित्रकला स्पर्धेत प्रथम आहिल आतार , द्वितीय आयुष पवार, तृतीय सार्थक जाधव आणि वेदांत फुले तर भाषण स्पर्धेत प्रथम आर्यन  गवळी, द्वितीय देवर्ष बोडरे ,तृतीय औदुंबर आगम आणि  नृत्य(डान्स) स्पर्धात प्रथम यशराज चव्हाण,द्वितीय विवेक जरांडे  या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र,मेडल्स आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अनिल गवळी यांनी केले,तर आभार अरुणा आगम मॅडम यांनी केले.





 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test