आजी माजी सैनिक संघटनेचा गरीब रुग्णाला मदतीचा हात ..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना व सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी यांचे वतीने निंबुत येथील सुरेश बाजीराव भंडलकर या गरीब व्यक्तीचा तीन वर्षाचा नातु डॉ मुथा बारामती यांच्या प्रयत्नाने ठिक झाला. लाखो रुपये खर्च झाले बीलासाठी डॉ सौरभ काकडे यानी देखील मदत केली . दवाखान्याने मेटाकुटीला आलेल्या पालकाना मेडीकल चे ७७००/- रु भरणे देखील अवघड झाले होते "समाजसेवा" गृप चे ॲडमीन मदन काकडे यानी मदतीचे आवाहन केले .त्यावर बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर व सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी तर्फे अँँड.गणेश आळंदीकर ,अध्यक्ष अनिल शिंदे ,कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,बाळासाहेब गायकवाड, नितीन शेंडकर ,ओंकार कुंभार ई नी मेडीकल साठी रक्कम ७७००/- रोख त्याना मदत दिली .