Type Here to Get Search Results !

आर्यन पंप, इंदापूर निर्मित एक्सपोर्ट क्वालिटी जेटिंग व सक्शन मशीन व्हॅनची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

आर्यन पंप, इंदापूर निर्मित एक्सपोर्ट क्वालिटी जेटिंग व सक्शन मशीन व्हॅनची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी


पुणे, दि. 20 : आर्यन पंप, इंदापूर निर्मित एक्सपोर्ट क्वालिटी जेटिंग व सक्शन मशीन व्हॅनची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात पाहणी केली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश येनपुरे, आर्यन कंपनीचे प्रशांत सुतार, अनिल गावडे, संदिप आंबेकर आदी उपस्थित होते. 

आर्यन पंप अँड इन्विरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही इंदापूर जिल्हा, पुणे येथे कार्यरत कंपनी असून या कंपनीकडून अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित रिसायकलर सक्शन आणि जेट्टींग वाहने निर्माण केली जातात. रिसायकलर मशीनच्या जेटिंगद्वारे ड्रेनेज लाइन मधील चोकअप काढून सक्शनद्वारे ड्रेनेज चेंबर मधील मैला, गाळ उपसा करण्याचे कार्य पूर्णत्वे ऑटोमॅटिक रिमोटने केले जाते. जेटींगसाठी लागणारे पाणी हे ड्रेनेज चेंबर मधील पाणी घेऊन ते रिसायकल करून पुन्हा वापरले जाते. त्यासाठी बाहेरून होणाऱ्या पाण्याचा वापर एकदम कमी होतो.  आर्यन पंप अँड इन्विरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी ची उत्पादने सर्व भारतभर कार्यरत आहेत. मुंबई , पुणे, नवी दिल्ली, बंगलोर, चेन्नई अशा शहरांमध्ये कंपनी द्वारा निर्मीत वाहने कार्यरत आहेत.
***

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test