Type Here to Get Search Results !

सोमेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

सोमेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा 

देवस्थान सचिव राहुल भांडवलकर यांच्याकडून कर्मचारी दत्तात्रय शिंदे यांना कौतूकाची थाप 

सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

सोमेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्याने नजरचूकीने विसरून राहीलेला फोटोग्राफरचा किमती ऐवज परत करत प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे.


श्री सोमेश्वर मंदिर करंजे येथील भक्त निवास कार्यालयात निरा येथील प्रसिद्ध छायाचित्रकार भालचंद्र भिलारे यांच्याकडून दिनांक २१ ऑगस्ट रोजी नजरचूकीने विसरून राहिलेला फोटोग्राफीसाठीच्या लाईट्स उपकरणांचा संच देवस्थान कर्मचारी दत्तात्रय तुकाराम शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तो पाच दिवस श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मधे सुरक्षित ठेवून आज गुरुवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी योग्य ती खातरजमा करून भालचंद्र भिलारे यांच्या सुपूर्द केली.  यावेळेस स्थानिक पत्रकार तथा भारतीय पत्रकार संघ बारामती उपाध्यक्ष विनोद गोलांडे आणि पुजारी प्रदिप भांडवलकर उपस्थित होते.
त्यांच्या या प्रामाणिक व निस्वार्थीपणाचे देवस्थानचे सचिव राहुल भांडवलकर यांनी कौतुक केले.


देवस्थान परिसरात भाविकांकडून विसरून राहिलेल्या कोणत्याही स्वरूपातील वस्तू जर देवस्थान व देवस्थान कर्मचारी यांच्या निदर्शनास आल्यास त्या निश्चितच सुरक्षित राहून त्यांची खातरजमा करून संबंधित व्यक्तीस परत करण्यात येतात. याचाच प्रत्यय कर्मचारी शिंदे यांनी देत देवस्थानच्या नावलौकिकास साजेसे काम केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test