Type Here to Get Search Results !

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.



माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.


माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी सर्वोच्च त्याग केला. एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलण्यासाठी देशाला सज्ज केले. संगणकक्रांती, डिजिटलक्रांती विचारपूर्वक घडवून आणली. ग्रामीण भागात दूरध्वनीसेवा पोहचवली. पंचायतराज व्यवस्था भक्कम केली. नवोदय विद्यालयांची पायाभरणी केली. युवकांना अठराव्या वर्षी मतदानाचा हक्क दिला. देशाला आधुनिक विचार, जागतिक व्यासपीठांवर सन्मान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या रुपाने देशाला युवा, कर्तबगार, दूरदृष्टीचं, सुसंस्कृत नेतृत्वं लाभलं होतं. डिजिटल क्रांतीची सुरुवात स्वर्गीय राजीव गांधींनी केली होती. कोरोना संकटकाळात ‘वर्क फ्रॉम होम’ त्यांच्या दूरदृटीमुळे शक्य झाले, याची जाणीव ठेवून त्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. लोकप्रिय  पंतप्रधान म्हणून राजीव गांधी नेहमीच स्मरणात राहतील. राजीव गांधी यांची जयंतीनिमित्त सद्‌भावना दिवस साजरा होत आहे. सर्वांना सद्‌भावना दिनाच्या शुभेच्छा. यानिमित्ताने हिंसाचारमुक्त समाजाच्या निर्मितीस मदत होईल. स्वर्गीय राजीव गांधी जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test