Type Here to Get Search Results !

गुरुवर्य जगन्नाथ कृष्णाजी लोंढे तथा ज.कृ.लोंढे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यांचे वृद्धापकाळाने ९०व्या वर्षी निधन

गुरुवर्य जगन्नाथ कृष्णाजी लोंढे तथा ज.कृ.लोंढे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यांचे वृद्धापकाळाने ९०व्या वर्षी निधन 

गुरुवर्य जगन्नाथ कृष्णाजी लोंढे तथा ज.कृ.लोंढे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यांचे आज बुधवार दिनांक १८ऑगष्ट २०२१रोजी वृद्धापकाळाने ९०व्या वर्षी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली....                                     सन १९५१-५२ मध्ये ते पुणे लोकल बोर्डाच्या आदेशाने प्रथम वाणेवाडी तालुका बारामती येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत दाखल झाले.तेथे त्यांनी अल्पकाळात शिक्षणाबरोबर कुस्तीचे धडे विद्यार्थ्यांना दिले.त्यांना त्यावेळी कै.नानासाहेब जगताप तथा रामराजे जगताप,कै.गुलाबराव जगताप (पादगुडे) तथा आप्पा यांनी मोलाची साथ दिली.त्यांचे तेथील विद्यार्थी पुढे समाजकारण व राजकारण या क्षेत्रात चमकले.त्यात कै.शिवाजीराव भोसले,कै.आनंदराव भोसले श्री.रघनाथदादा भोसले.तुकाराम आण्णा जगताप ते हे मान्यवर होत.पुढे सन १९५३-५४मध्ये बदलीने गुळुंचे तालुका पुरंदर येथे सेवेत दाखल झाले.त्यांच्या कामाची प्रचिती तात्कालीन पुरंदरचे सभापती कै.विजयसिंह निगडे  यांना आली.एक कृतिशील, उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांना तालुका,जिल्हा पातळीवर गौरविण्यात आले.मात्र त्यांना गुळुंचे येथील शाळेतच ठेवण्यात आले कारण इयत्ता पहिलीचा वर्ग शिकवा तर लोंढे गुरुजी व सातवीच्या वर्ग शिकवावा तर ना.वा. कांबळे गुरुजींनी असे समिकरण झाले होते..मग सांस्कृतिक कार्यक्रम,प्रौढ शिक्षण हे कार्यक्रम त्यांनी कल्पकतेने आणि निष्ठेने राबविले..त्यामुळे तात्कालीन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कै.उरसळ आण्णा यांनीही त्यांची पारख केली या गुणी शिक्षकांच्या अंगी वादन,गायन या कला उपजतच होत्या त्यामुळे हे व्यक्तिमत्व इतरांच्यात उठून दिसे.त्याकाळी बिनबियाचे झाड,भ्रमाचा भोपळा,पुढारी पाहिजे,डॉ.कैलास इत्यादि नाटके बसवून त्यात भूमिका ही साकारल्या...त्या गाजल्या...हे विशेष कारण त्याकाळी प्रसारमाध्यमे नव्हती..ते उत्तम कवी,शाहीर,गायकही होते त्यांनी अनेक लोकगीते,भीम गीते,पोवाडे लिहिले व सादरही केले.आकाशवाणी पुणे केंद्रावर त्यांचे कार्यक्रम झाले.लेझीम पथक,गायन पार्टी यांचे वस्तुपाठ विद्यार्थ्यांना दिले.दैनिक प्रभात पुणे या वृत्तपत्रात शाहिर हेमंत मावळे यांनी डफावरची थाप हे सदर लिहिले त्यात.लोंढे गुरुजींच्यावर सुंदर लेख लिहून कौतुक केलेले दिसते.पुढे ललित मित्र हा पुरस्काराने खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले  त्यांचे व्यक्तिमत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या व्यक्तीमत्वाने प्रेरित झाले होते.सेवानिवृत्तिनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील,सक्रिय कार्यकर्ते म्हणून पुरंदर तालुक्यात काम करीत होते त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांच्या पुढे ते आदर्शवत होते.माजी जि.प. सदस्य.लक्ष्मण चव्हाण यांचे ते खंदे समर्थक व स्नेही होते..त्यांनी भटकासमाज यांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले.त्यांच्या मागे दोन मुले तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.. आशा या बहुयामी,मानवतेचा,सतत विचार करणाऱ्या व्यक्तीलामत्वाला आज आपण मुकलोय आहोत.माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली...

माहिती-एस.एस.गायकवाड सर, करंजेपूल (बारामती)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test