निरेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी जिल्ह्यात केला विक्रम...
निरा प्रतिनिधी
रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून नीरेत आयोजिलेले
रक्तदान शिबीर अभिमानास्पद आहे.निरेतील समाजोपयोगी व विकास कामासाठी मदत करणार असल्याची ग्वाही मावळचे राष्ट्रवादीचे आ. सुनिल शेळके यांनी नीरा ( ता.पुरंदर) येथे दिली.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसा निमित्त कै.वसंतराव चव्हाण बहुजन विकास प्रतिष्ठान, नीरा, निरामाई महिला मंडळ , नीरा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नीरा यांच्या वतीने गुरूवारी (दि.५) आयोजित केलेल्या
भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मावळचे आ.सुनिल शेळके, माजी आ.अशोकराव टेकवडे, बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे, प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, राजवर्धन शिंदे, दत्ताजीराव चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, , छञपतीचे व्हा.चेअरमन अमोल पाटील, लक्ष्मणदादा चव्हाण,राहुल चोरघडे, लक्ष्मण बांदल, नितीन दांगट, अनिल चव्हाण, अजिंक्य टेकवडे, जयदीप बारभाई, कांचन निगडे, बाळासो गार्डी, मनोज शहा, दिलीप थोपटे, गौरी कुंजीर, रेेेखा चव्हाण, ऋतुजा धुमाळ, कोमल निगडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रमोद काकडे यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते , संयोजक, आयोजक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पञकार, पोलिस, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, शिक्षक यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित
करण्यात आले. रक्तदान शिबीरात ५७५ पुरूषांसह महिलांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान करून जिल्ह्यात विक्रम केला. रक्तदात्यांना पाण्याचा जार भेट देण्यात आला.
प्रास्ताविकात आयोजक व समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण यांनी ना. अजित पवार यांनी कोरोना काळात रक्तदान करण्याची सुचना केली त्या सुचनेनुसार रक्तदान शिबीर आयोजित केल्याचे सांगितले.
सुञसंचालन तनुजा शहा व नेहा शहा यांनी केले.
आभार अँड.पृथ्वीराज चव्हाण यांनी मानले
-----------------------------------------------
निरेतील रक्तदान शिबीरातून ना. अजित पवार यांचे विचार घराघरांत पोहचले.- गारटकर
सामाजिक काम करताना संयम पाळावा लागतो. राजेश चव्हाण यांनी नीरेत रक्तदान शिबीर आयोजित करून ना.अजित पवार यांचे विचार घराघरांत पोहोचविण्याचे काम केले हे कौतुकास्पद असल्याचे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केले.