Type Here to Get Search Results !

मयुरेश्वर ला श्रावणातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने भावीकांनी श्रींच्या कळश व पायरी दर्शन घेत समाधान केले व्यक्त.

मयुरेश्वर ला श्रावणातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने भावीकांनी  श्रींच्या कळश व पायरी दर्शन घेत समाधान केले व्यक्त.

मोरगाव प्रतिनिधी

अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथे  आज श्रावणातील संकष्टी  चतुर्थीच्या निमित्ताने भावीकांनी गर्दी केली होती . कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी  जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त श्रींच्या कळश व पायरी दर्शनासाठी येताना आढळून येत होते .


हिंदू धर्मामध्ये श्रावण महीना पवित्र समजला जात असल्याने तीर्थक्षेत्र ठिकाणी अनेक भक्त दर्शनासाठी जातात . मात्र  राज्य शासनाच्या आदेशानुसार  गतवर्षीप्रमाणे याही वर्षी  अष्टविनायकापैकी प्रथम तीर्थक्षेत्र असलेले मयुरेश्वर मंदिर कोरोनामुळे  खबरदारीचा उपाय म्हणून सर्व  भावीकांना दर्शनासाठी बंद आहे .  मात्र चतुर्थी व श्रावण महीना या दुहेरी योगामुळे अनेक भक्त दर्शनासाठी आले होते .


आज चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे गुरव मंडळींची पुजा तर सकाळी सात व दुपारी बारा वाजता पुन्हा पुजा झाली यावेळी श्रींस नैवद्य दाखविण्यात आला . सकाळपासून दुपार पर्यंत भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या . चतुर्थीच्या निमित्ताने पेठेतील दुकाने हार दुर्वा , श्रींच्या प्रतीमांनी सजवली होती .येणारे अनेक भक्त कोरोनाचे संकट जाऊन लवकर श्रींचे दर्शन होण्यासाठी मनोमन आराधना करताना आढळत होते . रात्री चंद्रोदयाच्या वेळी  आरती नंतर मयुरेश्वरास महानैवेद्य दाखविण्यात आला 


फोटो ओळ : संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने भावीकांनी पायरी दर्शनासाठी लावलेल्या रांगा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test