राहुरी,अहमदनगर येथे होणारी सैन्य भरती प्रक्रिया मध्ये बदल- मेजर सुभाष सासने
पुणे, सैन्य भरती मुख्यालय, पुणे विभाग पुणे यांच्याद्वारा सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2021 या कालावधी मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथे करण्यात आले होते. परंतु कोरोना विषाणु महामारीच्या सद्याच्या परिस्थिती पहाता सदर सैन्य भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचे सैन्य भरती मुख्यालय, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
सैन्य भरती मेळाव्याची पुढील तारीख नंतर कळविली जाईल. तरी जिल्हयातील संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (नि.), यांनी केले आहे.