Type Here to Get Search Results !

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून बुधवारपासून MH-42-BD ही मालिका ...

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून बुधवारपासून MH-42-BD ही मालिका ...
बारामती प्रतिनिधी

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मालिका बुधवार दिनांक १८/०८/२०२१ रोजी सुरु होत आहे.आकर्षक नंबर आरक्षित करने करिता MH-42-BD ही मालिका दुचाकी वाहनांसाठी सुरु होत आहे.या दुचाकी वाहन मालिकेतील क्रमांक चारचाकी वाहनांना देखील आकर्षक क्रमांक घेता येतील.

    दुचाकी वाहन मालिकेतील नोंदणी क्रमांक प्रथम प्रधान्याने विहित शुल्क भरून चारचाकी वाहनांना देण्यात येणार आहेत.व त्यानंतर दुचाकी वाहनांना देण्यात येणार आहेत.
    
    दुचाकी वाहन मालिकेतील वाहन क्रमांकासाठी ज्या चारचाकी व दुचाकी वाहन मालकांना आकर्षक  तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (चारचाकी वाहनांसाठी विहित शुल्काच्या तिप्पट) भरून घ्यावयाचा असेल आशा वाहन मालकांनी बुधवार दिनांक १८/०८/२०२१ रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज व आकर्षक क्रमांकाचे शुल्क रक्कम डी.डी.सह जमा करावा. अर्ज नमूना व आवश्यक क्रमांकासाठी भराव्या लागणाऱ्या शुल्काची माहिती कार्यालयीन वेळेत बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवार दिनांक१३/०८/२०२१ रोजी कार्यालयातील फलकावर प्रदर्षित करण्यात येणार आहे.
    
      आकर्षित क्रमांकाच्या अर्जा सोबत केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५ अ मध्ये विहित केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षाकित प्रत सदर करने आवश्यक असेल.(उदा. लाईटबिल,टेलीफोन बिल इत्यादी) तसच अर्जदार यांची ओळख पटवण्यासाठी अर्जासोबत अर्जदार यांचा फोटो ,ओळखपत्र,(उ दा. आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,पासपोर्ट, पँनकार्ड इ.) ची साक्षाकित प्रत सादर करावी लागणार आहे.
      
    एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी शुक्रवार दिनांक २०/०८/२०२१ रोजी सकाळी १२ वाजे पर्यंत कार्यालयातील नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. एकच नंबर कविता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या नंबरचे बंद पाकीट लिलाव पद्धतीने वाटप केले जाईल.
    
      या यादीतील अर्जदारांना लीलावा करिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी सोमवार दिनांक २३/०८/२०२१ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सीलबंद लोकनाट्यात लिलावासाठी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विनिर्दिष्ट केलेल्या फिच्या डीडी डीवाय आरटीओ बारामती यांच्या नावे नॅशनलाईज्ड/शेड्यूल्ड बँकेचा बारामती येथील असावा. त्यासोबत अर्जदारास पॅन कार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. सोमवार दिनांक २३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.३० वाजता बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित व्यक्ती समोर विनिर्दिष्ट सुखापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमुना पसंती क्रमांक वितरित केला जाईल. लिलावाच्या वेळी चार चाकी वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
      
   एकदा आरक्षित केलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. आरक्षित ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व ती सरकार जमा होईल.कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रधान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही. अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही. आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांककासाठीचे विहित शुल्क नमुन्यातील अर्ज व मूळ आधार कार्ड व पॅन कार्ड सह अर्जदार यांनी कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत सादर करावे. असे आव्हान बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील व राजेंद्र केसकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test