राष्ट्रवादी भटक्या-विमुक्त सेल उपाध्यक्षपदी प्रताप गायकवाड यांची नियुक्ती
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलच्या तालुका उपाध्यक्षपदी करंजे (ता बारामती) प्रताप सोमनाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली.
बारामती येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात तालुकाध्यक्ष संभाजी होळकर सेलचे तालुकाध्यक्ष किसनराव तांबे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, मुरलीधर ठोंबरे , रावसाहेब चोरमले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विमुक्त जाती भटक्या जमाती व त्यांचे प्रश्न मार्गी गे लागण्यासाठी प्रयत्न करू व त्यांना न्याय मिळवून देण्याचेही काम करू असे गायकवाड यांनी निवडीनंतर मान्यवरांना बोलताना सांगितले