सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांचे पोलीस पथकाने वडगाव निंबाळकर पोलीस (ता बारामती) स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रेते यांच्या वर छापा टाकत विक्रेते यांच्या वर कडक कारवाई केली .
वडगांव निंबाळकर हद्दीतील विविध गावातील दारू विक्रेते...
1) हनुमंत रामचंद्र सोनवणे रा.अशोकनगर पणदरे ता.बारामती जि.पुणे
२) प्रकाश चैनसिंग नवले रा.निंबुत ता बारामती जि पुणे
३) भाऊसाहेब तुळशीराम यादव रा.बारामती जि. पुणे
४) मोनिका विजय गायकवाड रा.मोरगाव ता.बारामती जि. पुणे
५) सागर लाला भोसले रा.भोसलेवस्ती कारखेल ता.बारामती जि.पुणे
६) पूजा अरुण मोरे रा.पाचगाळे कोऱ्हाळे बु|| ता.बारामती
७) शंकर उर्फ नाना अशोक कडाळे
रा.पळशी ता.बारामती जि.पुणे
यांचेवर अचानक छापे मारून अवैद्य विक्री साठी आणलेली एकूण ५८६२ रुपयांची दारू जप्त करून दारूबंदी कायद्यान्वये ७ गुन्हे दाखल करून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
तसेच यापुढील काळात देखील अवैध व्यवसाय विरुद्ध कडक कारवाई करणेत येईल, असे त्यांनी सांगितलेले आहे