भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण
भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.05 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे-1 या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविले आहे.
राज्यपाल दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर असून 15 आणि 16 ऑगस्ट या दिवशी ते वेगवेगळ्या कार्यक्रमाला, स्थळांना भेटी देणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे.