महत्त्वाची बातमी ; बारामती तालुक्यात आजपासून दुकान वेळ 4 ऐवजी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू; नियम अटी लागू
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
पुणे ग्रामीण मधील दुकाने कधी सुरू होणार याकडे व्यावसायिकांचे लक्ष लागले होते. जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून पुणे जिल्हा ग्रामीण मधील किराणा दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट तसेच बार पूर्ण वेळ सुरू राहतील असे आदेश म्हटले केले आहेत.यासंदर्भात बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी हा आदेश पुढे जारी केला आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे सर्वच व्यावसाईकांना बंदणकारक आहे.