शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तेलबिया व कडधान्य खरेदीसाठी ईच्छुक खरेदी संस्थेने 24 ऑगस्ट पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे दि. 12 :- राज्यात हंगाम 2021-22 मध्ये पुणे जिल्ह्यात नाफेडमार्फत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मुग, उडीद व सोयाबीन खरेदीची केंद्र सुरु करण्याचे नियोजन करावयाचे आहे. खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठी ईच्छुक खरेदी संस्थेने 24 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, सहकार वैभव, प्लॉट नं. ई-3, गुलटेकडी मार्केटयार्ड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंक अधिकारी यांनी केले आहे.
खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठी पुढील प्रमाणे निकष ठेवण्यात आले आहेत. खरेदी केंद्र मंजूर करताना प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे, जिल्हा / तालुका स्तरावरून अ वर्ग सभासद असलेले खरेदी विक्री संघ, पणन प्रक्रिया सहकारी अ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणी वरील दोन्ही अ वर्ग सभासद संस्था कार्यरत नसतील त्या ठिकाणी इतर सहकारी संस्थेस व वर्ग सभासद करून घेवुन खरेदीचे काम देणे. मात्र सदरची संस्था किमान दोन वर्षापुर्वी नोंदणी झालेली असावी, ज्या ठिकाणी अ वर्ग व वर्ग सहकारी संस्था खरेदी करण्यास तयार नसेल त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती, एफपीओ.
खरेदी करणा-या संस्थेकडे खालील साधनसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचा दाखला- मायश्चर मिटर,चाळणी,ताडपत्री,संगणक, संगणक चालवणे क्षमता असलेल्या जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्ट फोन, संगणक हाताळणेकरिता प्रशिक्षित असलेला सेवकवर्ग,इलेक्ट्रॉनिक वजन काटा.
पुढील बाबींकरिता सहाय्यक निबंधक यांचे प्रमाणपत्र घेण्यात यावे- वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीपूर्वी संस्थेचे स्वत:चे भाड्याचे गोदाम असलेबाबत, अन्नधान्य / कडधान्य व तेलबिया इत्यादी खरेदी विक्रीचा किमान 1 वर्षांचा अनुभव, खरेदी केंद्र चालविण्याकरिता आवश्यक सेवक उपलब्ध असल्याचे, काळया यादीत / अपहार फौजदारी गुन्हा या संबंधी कार्यवाही झालेली नसल्याबाबतचे.
संस्थेने द्यावयाच्या कागदपत्राबाबत- मागील तीन वर्षाचे सनदी लेखापाल / शासकिय लेखापरीक्षक यांनी साक्षांकित केलेली ताळेबंद पत्रके सादर करावीत, पैनकार्डची प्रत, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र,संस्थेकडे रु. १० लाख खेळते भांडवल असल्याबाबतचे बँकेचे प्रमाणपत्र /बँक पासबुक नोंद.(ज्या संस्थेला पणन महासंघाकडून अनुषंगीक व इतर खर्चापोटी रक्कम देय असल्यास त्याचा समावेश करण्यात यावा), आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी नाफेडने निश्चित केलेले स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मान्य असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र (अफीडेव्हीट),संस्थेकडून खरेदी / नोंदणी मध्ये गैरव्यवहार / अनियमितता झाल्यास प्रशासकीय खर्च देय असणार नाही ही अट मान्य असल्याचे संमती पत्र.
जिल्हा पणन अधिकारी यांनी द्यावयाची प्रमाणपत्र- मागील वर्षीच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये ऑफलाईन खरेदी/गैरव्यवस्थापन न केल्याबाबत दाखला, खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र,अ किंवा "ब"वर्ग सभासद आहे किंवा नाही (मार्क होय / नाही) नसल्यास "ब" वर्गाचा प्रस्ताव सादर केला आहे काय.तरी ईच्छुक खरेदी संस्थेने 24 ऑगस्ट रोजी सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, सहकार वैभव, प्लॉट नं. ई-3, गुलटेकडी मार्केटयार्ड, दुरध्वनी क्र.20-24270141, 24264623, मो. नं. 7972558629 या ठिकाणी संपर्क साधावा, असेही जिल्हा मार्केटिंग अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.