जेजुरी पोलिसांची कारवाई; गुंड गणेश रासकर खून प्रकरणात आणखी 2 आरोपींना 6 धारदार हत्यारासहित अटक.
गुंड गणेश रासकर खून प्रकरणातील आणखी दोन आरोपींना सहा धारदार हत्यारासह अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहिती नुसार दिनांक 2 ऑगस्ट रोजी जेजुरी पोलीस ठाण्यास खात्रीशीर माहिती मिळाली की नीरा या ठिकाणी काही दिवसापूर्वी गणेश रासकर या गुंडाचा खून झालेला आहे. खून करण्यापूर्वी आरोपी गौरव लकडे निखील रवींद्र डावरे व कटात सहभागी असणारा जाधव यांनी गणेश रासकर याला संपवण्यासाठी हत्यारांची जमवाजमव केली होती व सदरची धारदार हत्यारे अविनाश विष्णू भोसले (वय 27 वर्षे) व विठ्ठल अशोक मोहिते (वय 21वर्षे) राहणार दोघेही निरा यांच्या ताब्यात दिली होती. व त्यांनी जर कोणास माहिती दिली तर त्यांना सुद्धा मारण्याची धमकी दिली होती, परंतु वरील तिघांनी त्याचा पिस्तुलाने गोळ्या घालून खून केला परंतु जी धारदार हत्यारे गणेश रासकर ला मारण्यासाठी आणून ठेवली होती ती एका खोलीत वरील दोघांच्या ताब्यात अद्यापही आहेत अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने नीरा मध्ये जाऊन शोध घेतला असता त्याठिकाणी 6 धारदार हत्यारे मिळाली त्यामुळे सध्या माननीय जिल्हाधिकारी यांचा हत्यार बंदी आदेश लागू आहे. त्याचंही उल्लंघन झालेला आहे. वरील अविनाश भोसले विठ्ठल मोहिते व जेलमध्ये असणारे निखील डावरे गौरव लकडे व गणेश लक्ष्मण जाधव, जगन्नाथ जाधव यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 व हत्यार बंदी कायदा कलम 4 25 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मा. मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, गोत पगार, पोलीस हवलदार संदीप कारंडे, संदीप मोकाशी, पोलीस नाईक धर्मवीर खांडे, चालक पोलीस नाईक भानुदास सरक, पोलीस शिपाई तात्यासाहेब खाडे यांनी केलेली आहे.
[8/3, 4:35 PM] AIJ संदीप झगडे:
गुंड गणेश रासकर खून प्रकरणात आणखी 2 आरोपींना 6 धारदार हत्यारासहित अटक: जेजुरी पोलिसांची कारवाई