Type Here to Get Search Results !

पुणे विभागातील 18 लाख 62 हजार 639 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 19 लाख 27 हजार 240 रुग्ण- सौरभ राव

पुणे विभागातील 18 लाख 62 हजार 639 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 19 लाख 27 हजार 240 रुग्ण- सौरभ राव

 
पुणे, पुणे विभागातील 18 लाख 62 हजार 639 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 27 हजार 240  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 780 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 39 हजार 821 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.65 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा...
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 8 हजार 427 रुग्णांपैकी 10 लाख 81 हजार 809 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 118 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.60 टक्के आहे.

सातारा जिल्हा...
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 35 हजार 696 रुग्णांपैकी 2 लाख 22 हजार 807 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 996 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा...
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 90 हजार 661 रुग्णांपैकी 1 लाख 82 हजार 84 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 815 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 762 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा...
सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 1 लाख 89 हजार 575 रुग्णांपैकी 1 लाख 80 हजार 385 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्य 4 हजार 201 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 989 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा...
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 2 हजार 881 रुग्णांपैकी 1 लाख 95 हजार 554 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 650 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 677  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 590 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 881, सातारा जिल्ह्यात 529, सोलापूर जिल्ह्यात 469, सांगली जिल्ह्यात 475 तर कोल्हापूर जिल्ह्यात 236 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण...
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 658आहे. पुणे जिल्हयामध्ये 772, सातारा जिल्हयामध्ये 1272, सोलापूर जिल्हयामध्ये 683, सांगली जिल्हयामध्ये 663 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 268 रुग्णांचा समावेश आहे.
 
पुणे विभागातील सर्व्हेक्षण...

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 47 लाख 72 हजार 133 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 27 हजार 240 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test