Type Here to Get Search Results !

पुणे विभागातील 18 लाख 47 हजार 402 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 19 लाख 14 हजार 676 रुग्ण - सौरभ राव

पुणे विभागातील 18 लाख 47 हजार 402 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 19 लाख 14 हजार 676 रुग्ण - सौरभ राव
  
पुणे  : पुणे विभागातील 18 लाख 47 हजार 402 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 14 हजार 676  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या  27 हजार 792 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण  39 हजार 482 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.49 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
            पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख  3 हजार 14 रुग्णांपैकी  10 लाख 76 हजार 181 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 377 आहे. कोरोनाबाधित एकूण  18 हजार 456 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  97.57 टक्के आहे.
सातारा जिल्हा
              सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 33  हजार 373 रुग्णांपैकी 2 लाख 19 हजार 704 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 963 आहे. कोरोनाबाधित एकूण  5 हजार 706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
              सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 88  हजार 579 रुग्णांपैकी  1 लाख 79  हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार 445 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
सांगली जिल्हा
               सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण  1 लाख 87  हजार 629 रुग्णांपैकी  1 लाख 77 हजार 713 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 971 आहे.  कोरोनाबाधित एकूण 4 हजार 945 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा 
            कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 2 हजार 81 रुग्णांपैकी  1 लाख 94 हजार 392 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 36 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये  2 हजार 379 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 755, सातारा जिल्ह्यात 434, सोलापूर जिल्ह्यात  417, सांगली जिल्ह्यात 576 तर कोल्हापूर जिल्ह्यात 197 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 481 आहे. पुणे जिल्हयामध्ये 920 , सातारा जिल्हयामध्ये 719, सोलापूर जिल्हयामध्ये 758, सांगली जिल्हयामध्ये 629 व कोल्हापूर जिल्हयामध्ये  455 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण  1 कोटी 44 लाख 59 हजार 369 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  19 लाख  14 हजार 676 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
             (टिप :- दि. 20 ऑगस्ट 2021   रोजी रात्री  9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test