1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित
मा.भारत निवडणूक आयोगाने, दि. 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत दि. 9 ऑगस्ट,2021 (सोमवार) ते दि. 31 ऑक्टोबर, 2021 (रविवार) पर्यंत दुबार व समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दुर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी / पडताळणी करणे, योग्य प्रकारे विभाग / भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. तसेच दि. 01 नोव्हेंबर 2021 (सोमवार) रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणेत येणार आहे. दि. 1 नोव्हेंबर 2021 (सोमवार) ते दि. 30 नोव्हेंबर(मंगळवार) दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी आहे. दि. 20 डिसेंबर, 2021 (सोमवार) पर्यंत दावे व हरकती निकाली काढणेत येणार आहेत. तसेच दिनांक 05 जानेवारी, 2022 (बुधवार) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
तरी सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रका प्रमाणे करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.