या...हाॅटस्पाॅट व बाधित गावातील अन्टीजेन तपासणी
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
पंचायत समिती बारामती , आरोग्य विभाग
हाॅटस्पाॅट व बाधित गावातील अन्टीजेन तपासणी कार्यक्रम
बुधवार दिनांक 28/07/2021 रोजी सकाळी 10.00 वाजता खालील गावात अन्टीजेन तपासणी कार्यक्रम आयोजित केला. संबंधित गावातील *समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी* यांनी योग्य ते नियोजन करुन जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून घ्यावी.संबंधित प्रा आ केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी,सरपंच यांचे मार्फत पोलिस यंत्रणेला कळविण्यात यावे व त्यांची मदत अन्टीजन कॅम्प करीता घ्यावी. स्थानिक लोक प्रतिनिधी यांचा देखील सहभाग घेऊन जास्तीत जास्त तपासणी करून घ्यावी.
तालुक्यातील गावांची नावे...
1)दंडवाडी
2)जैनकवाडी
3)घाडगेवाडी
4)चोपडज
5)जळगाव सुपे
6)लाटे
वरील कार्यक्षेत्रातील प्रा आ केंद्र येथील वाहन सकाळी 9.00 पुर्वी मेडीकल काॅलेज येथे टेक्नीशीयन व साहित्य घेऊन जाण्यासाठी यावे.
समुदाय आरोग्य अधिकारी यांनी टेस्टिंग रिपोर्ट दर तासाला मा गटविकास अधिकारी/मा तालुका आरोग्य अधिकारी यांना फोन करून द्यावे.
@ THO Baramati