Type Here to Get Search Results !

आषाढी यात्रेसाठी इंसीडेंट कमांडर म्हणून अधिकारी नियुक्त - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

आषाढी यात्रेसाठी इंसीडेंट कमांडर म्हणून अधिकारी नियुक्त - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे :- आषाढी यात्रेसाठी पादूका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता इंसीडेंट कमांडर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सांगितले.
  आषाढी एकादशीला सर्वात मोठी यात्रा पंढरपूर येथे भरते. सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा ( कोविड- 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 23 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना शासनाने निर्गमित केलेली आहे. त्याअनुषंगाने आषाढी यात्रेसाठी पुणे जिल्हयातून  श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी देवाची, जि. पुणे., श्री. संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता. हवेली, जि. पुणे, श्री. संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र, सासवड, जि. पुणे व श्री. संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र, सासवड, जि. पुणे या चार पालख्या 8 बसेसव्दारे प्रस्थान करणार आहेत. पादूका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता इंसीडेंट कमांडर यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन कयदा 2005 नुसार अधिकाऱ्यांची इंसीडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.

ती  पुढील प्रमाणे

पालखीचे नाव ......

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी देवाची, जि. पुणे. खेडचे 
उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण संपर्क क्र.9763212813,  

श्री. संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता. हवेली जि. पुणे  हवेलीचे 
उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर संपर्क क्र.9822873333

श्री. संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड जि. पुणे दौंड-पुरंदरचे 
उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड संपर्क क्र.9860258932, 

श्री. संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र, सासवड, जि. पुणे पुरंदरचे 
नायब तहसिलदार उत्तम बढे संपर्क क्र.9402226218   हे आहेत.
 
नियुक्त इंसीडेंट कमांडर यांनी आषाढी यात्रा 2021 च्या अनुषंगाने शासनाकडील व विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडील सुचनांनुसार पुणे जिल्हयातील वरील मंजूर 4 देवस्थानच्या पालख्यांच्या प्रस्थानाच्या अनुषंगाने सुरुवातीपासून ते पंढरपूर येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सर्व कार्यवाही इंसीडेंट कमांडर यांनी करावी. संबंधीत उपविभागीय अधिकारी(इंसीडेंट कमांडर ) यांनी संस्थानांच्या प्रमुखांशी विचारविनिमय करून पादूकांचा मार्ग निश्चित करुन याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाशी व सोलापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून योग्य ते नियोजन करावे, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आदेशीत केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test