पंचायत समिती आरोग्य विभागमार्फत
शहर व ग्रामीण भागात ॲन्टीजेन तपासणी सुरू
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आज सकाळी 10.00 वाजता पंचायत समिती , आरोग्य विभागामार्फत शहर व ग्रामीण भागात घरोघरी जावून ॲन्टीजेन तपासणी करण्यात आली .
सदरचे तपासणी शिबीर...
मगरवाडी,
माळवाडी लोणी,
पानसरेवाडी,
पिंपळी,
शिरवली,
वंजारवाडी,
निंबुत,
माळेगाव बु.,
जीएम सीसीसी,
बारामती शहर सुपरस्प्रेडर,
आर.एस.सुपा,
डोर्लेवाडी ,
बांदलवाडी
या ठिकाणी राबविण्यात आले. यामध्ये पानसरेवाडी 115 , माळेगाव बु. 130, जीएम सीसीसी 130, बारामती शहर सुपरस्प्रेडर 150, डोर्लेवाडी 07, बांदलवाडी 102 इतक्या तपासण्या करण्यात आल्या.या ठिकाणी एकही पॉझिटिव्ह रूग्ण मिळाला नाही. तसेच मगरवाडी 102 तपासणी मध्ये 02, माळवाडी लोणी मध्ये 70 तपासणीमध्ये 07, पिंपळी 110 तपासणीमध्ये 02, शिरवलीमध्ये 100 तपासणीमध्ये 01, वंजारवाडी 107 तपासणीमध्ये 02, निंबूत 172 तपासणीमध्ये 03, आर.एस.सुपा 15 तपासणीमध्ये 05, असे एकूण 22 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. शहर आणि ग्रामीण भागामध्ये एकूण 1310 ॲन्टीजन तपासणी करण्यात आल्या, असे पंचायत समिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.