सावंतवाडीमधे 'डीड्स फॉर नीड्स' च्या संगिता सक्सेना आणि प्रिया कपाडिया मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण
बारामती प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून 'डीड्स फॉर नीड्स' च्या वतीने सावंतवाडी गावामधे मोठ्या प्रमाणावर ह्या संस्थेच्या माध्यमातून झाडांचे वाटप करण्यात येत आहे. यावर्षी देखील या संस्थेच्या वतीने गावाला १००० फळझाडे मोफत देण्यात आली आहेत. आज 'डीड्स फॉर नीड्स' च्या संस्थाचालिका संगिता सक्सेना मॅडम आणि प्रिया कपाडिया मॅडम यांनी सावंतवाडी गावाला भेट दिली.
याप्रसंगी त्यांच्यासोबत सोनल कपाडिया आणि मिसबाह मीठा यादेखील उपस्थित होत्या.
यावेळी गेल्या २ वर्षात त्यांच्या संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या झाडांची पाहणी करत त्यांनी त्या झाडांची सविस्तर माहिती घेतली. गावातील लोकांनी झाडे लावण्यासाठी आणि ती जगविण्यासाठी घेतलेले कष्ट पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या हस्ते गावातील प्रगतशील शेतकरी धर्मराज मारुती सावंत यांच्या शेतात दोन झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गावातील सुरज सावंत, शुभम सावंत, महेश सावंत, भिमराव सावंत, विजय सावंत आणि आदी ग्रामस्थ उपस्थित होते.