मशिनच्या साह्याने विहिरीचे खोदकाम करण्यास शेतकऱ्यांची पसंती
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीच्या पश्चिम भागातील नवीन विहिरींचे काम वाढले असून अनेक ठिकाणी विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. शेतात जुन्या विहिरी असल्या तरी नवीन विहिरींची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच वेळी पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे विहिरीची खोली वाढवावी यासाठी सोमेश्वरनगर परिसरात विहीर खोदणे व खोलीकरण करणे कामे वेगाने सुरू आहेत.
असे असताना आत्ताच्या आत्याधुनिक काळात विहिरीचे खोदकाम व खोलीकरण हे पोकलीन मशीनच्या साह्याने केले जाते व त्याला शेतकऱ्यांनी पसंतीही दिली आहे,,पूर्वी विहिरीचे खोदकाम हे मजूर वर्गाने व त्यानंतर ' यारी' या स्वरूपात करत होते परंतु त्या कामी मजूर संख्या व कालावधी जास्तीचा लागत होता परंतु आत्ताच्या काळात पोकलेन मशीन द्वारे तीन ते चार दिवसातच विहिरीचे काम हे साधारण 40 ते 50 फूट होतअसल्याने शेतकऱ्यांनी पोकलेन मशिनच्या साह्याने विहीर खोदणे व खोलीकरण करणे पसंत केले आहे, असे विहीर खोदकाम करणारे व्यवसायिक- जयसिंग चाचर मगरवाडी (ता बारामती) यांनी सांगितले आहे व यामुळे शेतकरी ही आनंदी असून मलाही दोन पैसे जास्तीचे मिळाल्याने मी हा व्यवसाय करत असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.