Type Here to Get Search Results !

'रोटरी क्लब ऑफ लोणंद'च्या अध्यक्ष पदी डॉ. अनिलराजे निंबाळकर व सेक्रेटरी डॉ.किशोर बुटियानी यांनी स्वीकारला पदभार.

'रोटरी क्लब ऑफ लोणंद'च्या अध्यक्ष पदी  डॉ. अनिलराजे निंबाळकर व सेक्रेटरी डॉ.किशोर बुटियानी यांनी स्वीकारला पदभार. 

 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ लोणंद चा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला तर  २०२१ - २२ या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. अनिलराजे निंबाळकर व सेक्रेटरी म्हणून डॉ.किशोर बुटियानी यांनी पदभार स्वीकारला.
कार्यक्रमासाठी नियोजित प्रांतपाल  रुखमेश जोखारिया  प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथुन आले होते.त्यांनी आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबचे कार्यक्रम व रोटरी क्लब चे महत्व याबद्दल माहिती दिली.

ऊपप्रांतपाल डॉ.नितीन कदम वाई यांनी रोटरी चे कार्य समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन केले

डॉ.अनिलराजे निंबाळकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले की सध्या वाई व कराड येथील आपदग्रस्तांना  रोटरी क्लब ऑफ लोणंद सर्वतोपरी मदत करण्यासाठी जाणार आहे.
लोणंद येथे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना सावली साठी मोठी छत्री देणार आहे. वर्षभर समाजसेवा करुन रोटरी चे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
सेक्रेटरी डॉ.बुटीयानी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले की समाजसेवी सर्व संस्थांना बरोबर घेऊन लोणंद येथील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचुन लोणंद च्या विकासासाठी प्रयत्न केले जातील. कार्यक्रमासाठी डॉ.नितीन सावंत उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.देशमुख, डॉ गणेश दाणी, प्रवीण चांदवडकर विश्वनाथ शानभाग यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी भरत गांधी, अहमद लोणंदवाला, रो.मुस्तफा, वैभव क्षिरसागर, अनिल शहा, बिपिन शहा, प्राजीत परदेशी, गोपाल खंडारे व सर्व मेंबर्स उपस्थित होते. तसेच सर्व Anns ही उपस्थित होत्या
यावेळी जयवंत शेळके, पांडुरंग चव्हाण, मलगुंडे सर यांनी रोटरी क्लब ऑफ लोणंद मधे प्रवेश केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दयाराम सुर्यवंशी यांनी केले.
आभार प्रदर्शन डॉ.किशोर बुटियानी यांनी केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test