सोमेश्वरचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांची सहकारी व खाजगी साखर कारखाना सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन समितीवर निवड
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वरचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांची सहकारी व खाजगी साखर कारखाना सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन समितीवर निवड नुकतेच केंद्र शासनामार्फत साखर उद्योगात खाजगी व सहकारी साखर
कारखान्यांनी अमलात आणलेल्या सर्वोत्कृष्ट व नाविन्यपुर्ण कार्यपद्धती देशातील सर्व साखर कारखान्यांना लागू करणे संदर्भात अखिल भारतीय साखर कारखाना संघाचे माध्यमातून समिती गठीत केली असून या समितीवर श्री सोमेश्वर सहकारी साखर
कारखान्याचे कार्यकारी संचालक.राजेंद्र नानासोा यादव यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत एकूण १६ सदस्य असून राज्याचे साखर आयुक्त व साखर संघाचे अध्यक्ष यासोबत राज्यातील सहकारी व खाजगी कारखान्यांचे प्रतिनिधी तसेच बँका व मार्केटींग क्षेत्रातील तज्ञांचा यामध्ये समावेश आहे. या समितीची यापुर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २२ जुलै रोजी ऑनलाईन झूम मिटींग पार पडली असून या समितीद्वारे
प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे अंतिम अहवाल शासनास सादर करण्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. या समितीद्वारे राज्यातील ऊस कृषी विज्ञान व शेती, ऊस तोडणी व वाहतूक,साखर व उपपदार्थ प्रक्रिया तथा अभियांत्रिकी, मनुष्य विकास व्यवस्थापन, खरेदी विक्री व्यवस्थापन आणि वाणिज्य, लेखा/वित्त व्यवस्थापन आणि बँकींग, कायदेशीर बाबी आणि
ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या नियमांची तरतुद/अनुपालन, संस्थांत्मक सामाजिक बांधिलकी जबाबदारी, माहिती तंत्रज्ञान या सर्व विषयांवर ही समिती राज्यातील सर्व साखर कारखानदारीचे सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण व्यवस्थापनाचा अभ्यास करुन अहवाल
तयार करणार आहे व हा अहवाल साखर संघामार्फत केंद्र शासनास सादर केला जाणार आहे.या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या समितीवर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र नानासोा यादव यांची निवड झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन. पुरुषोत्तम जगताप, व्हाईस चेअरमन श्री.शैलेश रासकर व सर्व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले व त्यांची निवड कारखान्यासाठी अभिमानास्पद असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.