निरा येथे गोळीबार,गुंड गणेश रासकर याच्या डोक्यात गोळ्या झाडत हत्या
पुरंदर तालुक्यातील नीरा ययेथे असणाऱ्या गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात गुंड गणेश विठ्ठल रासकर ( वय- ४१) यांच्यावर अज्ञाताने शुक्रवारी दि 16 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला. या गोळीबारात गुंड गणेश रासकर यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दि 16 रोजी शुक्रवारी सात वाजण्याच्या सुमारास पुणे -पंढरपुर या मार्गावर रेल्वे स्टेशनसमोरील एका दुकानाजवळ गुंड गणेश रासकर पल्सर गाडीवर आला हअसता, त्यावेळीअज्ञातांनी गणेश रासकर याच्यावर पाठीमागून गोळी डोक्यात झाडली असता तो जखमी अवस्थेत .
त्याला नीरा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारापुर्वीच तो मृत्यूमुखी पडला असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनीघोषित केले.