Type Here to Get Search Results !

सहाय्यक निबंधकाचा अजब कारभार...

 
 सहाय्यक निबंधकाचा अजब कारभार...

पुरंदर प्रतिनिधी

पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत आज दि.26 जुलै 2021 रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर सभासद शिक्षकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.सदर आंदोलन कोविड 19 चे सर्व नियम पाळून प्रधानिधीक स्वरूपात करण्यात आले.
आंदोलनाबाबत सहाय्यक निबंधक यांना आठ दिवसापूर्वीच कळविले होते.परंतु सहाय्यक निबंधक कार्यालयात उपस्थित नव्हते.पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये संचालक मंडळ गैरकारभार करीत आहेत.याबाबत सहाय्यक निबंधक यांच्याशी अनेकवेळा पत्रव्यवहार केलेला आहे परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.
श्री.सुनिल लोणकर हे अपात्र संचालक असताना सहाय्यक निबंधकाच्याआशीर्वादाने आजअखेर संचालक आहेत.आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सहाय्यक निबंधकांनी पत्राद्वारे  16 मे 2021 रोजी त्यांनी राजीनामा दिला आहे असेच एक पत्र ऑगस्ट 2019 रोजीच्या पत्राद्वारे श्री.सुनिल लोणकर यांनी राजीनामा दिला आहे.त्यामुळे ते संचालक पदावर नाहीत असे लेखी पत्र दिले  आहे  तर तिसऱ्या पत्रामध्ये सहाय्यक निबंधकांनी श्री.सुनिल पांडुरंग लोणकर हे 25 जून 2021 अखेर संस्थेत कार्यरत संचालक आहेत असे लेखी पत्र दिले आहे.
तिन्ही पत्रामध्ये प्रचंड  विसंगती व दिशाभूल केल्याची दिसून येत आहे.या विसंगतीमुळे सभासदांच्या मनात या कार्यकारी मंडळाविषयी अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.  अपात्र संचालक कार्यकारी मंडळात कार्यरत आहे.अपात्र असताना निवडी व निर्णयामध्ये सहभागी होतात.
संस्था कार्यालय खरेदी व्यवहारात किती रक्कमेच्या व्याजाचा भुर्दंड बसला याबाबत सर्व सभासद चिंतेत आहेत.
संस्था कार्यालय खरेदी करण्यास सभासदांची मान्यता नसताना 7,65,100/₹ फर्निचर खर्च करण्यात आला आहे. हा खर्च अनाठायी सभासदांच्या माथी मारल्याची भावना सभासदांची झाली आहे.तसेच सध्या हे फर्निचर कोठे गायब झाले याची चर्चा सभासदांमध्ये चालू आहे.
अशा अनेक बाबी चुकीच्या पद्धतीने होत असल्याने याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे  तोंडी व लेखी स्वरूपात निदर्शनास आणून दिल्या होत्या.परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले जाते. न्याय मिळविण्यासाठी आमच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर  आजपासून न्याय मिळेपर्यंत आंदोलन करीत आहोत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test