पिंपळीत आमदार रोहित पवार यांचे वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बारामती प्रतिनिधी
पिंपळी-लिमटेक गावातील नागरिकांच्या आरोग्य सेवेकरिता कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून व संकल्पनेतून फिरता दवाखाना हा उपक्रम राबवण्यात आला.
फिरता दवाखाना या उपक्रमाचे स्वागत सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी केले.
याप्रसंगी गावातील नागरिकांची बी.पी, शुगर आणि इतर आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.
आवश्यकतेनुसार औषधे ही मोफत वाटप करण्यात आली. काही दुर्धर आजारग्रस्त नागरिकांची पुढील तपासणी करण्यास सांगण्यात आले तसेच त्यांच्यावर पुढील उपचार देखील मोफत केले जाणार आहेत.
या उपक्रमाचे छत्रपती कारखाना भवानीनगर चे संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी कौतुक करून गावातील नागरिकांच्या वतीने आमदार रोहित पवार यांचे आभार मानले. ग्रामस्थ-नागरिकांनी देखील मोफत तपासणी केल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.
यावेळी संचालक संतोषराव ढवाण पाटील, बारामती खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन भाऊसो भिसे,सरपंच मंगल केसकर, उपसरपंच राहुल बनकर, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सुनिल बनसोडे,
बारामती कृषि मार्केट कमिटी चे मा.संचालक रमेशराव ढवाण पाटील,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,सदस्य आबासाहेब देवकातेपाटील, अजित थोरात, सदस्या स्वाती ढवाण पाटील, अश्विनी बनसोडे,कोमल टेंबरे, मंगल खिलारे, आ.रोहित पवार यांचे सहाय्यक हनुमंत होले,पिंपळी शाळा नियोजन समिती अध्यक्ष बापू केसकर, आरोग्य विभागाचे सी.एच.ओ.दिपाली शिंदे, आरोग्य सेवक राहुल घुले, आरोग्य सेविका नफिसा तांबोळी,आशा सेविका उल्का चांडे, रेखा तांबे, परिचर सुरेखा थोरात,सहाय्यक लिपिक अनिल बनकर, ऑपरेटर प्रसन्ना थोरात,ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ हरिभाऊ केसकर,अशोक ढवाण पाटील, सोना देवकाते पाटील, कालिदास खोमणे,शैलेश थोरात,नंदकुमार बाबर, कल्याण राजगुरू आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.